Home जिल्हा शूरवीरांच्या बलिदानातून मिळाले स्वातंत्र्य; देशाच्या प्रगतीसाठी कर्तव्यनिष्ठेने काम करा :-विवेक बोढे

शूरवीरांच्या बलिदानातून मिळाले स्वातंत्र्य; देशाच्या प्रगतीसाठी कर्तव्यनिष्ठेने काम करा :-विवेक बोढे

घुगुस :-आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात; देशभक्तीपर गीतांनी आणि बालकलाकारांच्या नृत्याने रंगला सोहळा भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करत घुग्घुस येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.



स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशभक्तिमय केले. लहान मुलींनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात सहभागी बालकलाकारांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. तसेच देशसेवेत योगदान दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला अभिवादन करण्यात आले.



यावेळी नगरसेवक विवेक बोढे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले, “भारत मातेच्या स्वातंत्र्यवीरांच्या त्याग व बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखून प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.



ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती कायम राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.



कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नागरिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.



यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक विवेक बोढे, नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेविका वैशाली ढवस, नगरसेविका चैताली सातपुते, भाजप युवानेते अमोल थेरे, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी नगरसेवक सुषमा सावे, गणेश कुटेमाटे, सचिन नांदे, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, चिन्नाजी नलबोगा, सिनू इसारप, हेमराज बोंबले, दिनेश बांगडे, बबलू सातपुते, सिनू कोत्तुर, अनिल रामपल्लीवार, स्वामी जंगम, हेमंत कुमार, पांडू थेरे, पियुष भोंगळे, सुशील डांगे, शंकर सिद्धम, संजय भोंगळे, प्रणय काटवले, सौरभ घोडके, योगेश घोडके, विक्की चिवंडे, सुरेंद्र झाडे आदी उपस्थित होते.