Home जिल्हा न. प.शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी अखेर आपला शब्द पाळला.

न. प.शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी अखेर आपला शब्द पाळला.

 

वरोरा :- स्वातंत्र दिना निमित्त देशात सगळीकडे देश भक्तीवर कार्यक्रम चालू असून वरोरा नगर पालिका उप नगराध्यक्षा तथा शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी शिक्षण सभापती चे सूत्र हाती घेताच नगर पालिकेच्या सर्व शाळामध्ये नर्सरी सुरु केली. शिक्षणाचा दर्जा उचवण्यास योग्य सूचना दिल्या. नगर परिषदे तर्फे नर्सरीच्या सर्व विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य 15 आगष्ट च्या अगोदर देण्याचा शब्द पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या मनात आनंद फुलवण्याचे सामाजिक कार्य केले असून लवकरच या विद्यार्थ्यांना लागेल ते शैक्षणिक साहित्य सुद्धा पुरवण्याचा मानस आहे.



या वेळी योगिता नेरकर यांनी बोलताना सांगितले की ही मुलं उद्याचे देश घडवणारे भविष्य असल्याने या मुलांना शिक्षणात आपल्याला जमेल तेवढी मदत करून सामाजिक कर्तव्य निभावण्याचे आवाहन सामाजिक क्षेत्रातील लोकांना केले आहे.यावेळी नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपनराध्यक्ष शिक्षण सभापती योगिता नेरकर, गटनेते गजानन मेश्राम सर्व सभापती,मुख्यधिकारी,सर्व नगर सेवक व नगर पालिका शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.