चंद्रपूर :- “रक्तदान करा, जीवन दान करा!” या उदात्त हेतूने आणि समाजातील प्रत्येक घटकाला जीवनदान देण्याच्या संकल्पनेतून वरोरा पोलीस यांच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक थेंब रक्त अनेकांचे जीवन वाचवू शकते’ हा संदेश देत खाकी वर्दीतील जवानांनी आता समाजसेवेचा विडा उचलला आहे.
गुन्हेगारीचा बिमोड करत असतानाच समाजहिताचा वसा जोपासणाऱ्या चंद्रपूर पोलिसांच्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्त्वाच्या टीप (कार्यक्रम तपशील) :- दिनांक १२/०८/२६, बुधवार, वेळ :- सकाळी ०९:०० ते दुपारी १४:०० वाजेपर्यंत
स्थळ :- पोलीस स्टेशन वरोरा, जि. चंद्रपूर
🩸 रक्तदानाचे फायदे 👇👇
⭕ रक्तदान पूर्णपणे सुरक्षित आहे.
⭕ सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत होते.
⭕ गरजू रुग्णांना थेट जीवनदान मिळते.
⭕ नियमित रक्तदान आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
“या पुण्य कार्यासाठी अवश्य सहभागी व्हा! रक्त दान करा, जीवन वाचवा.”




