Home जिल्हा वरोरा पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न; वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पोलीस...

वरोरा पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न; वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम!

वरोरा :-वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने आज पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा व सौंदर्यीकरणाचा संदेश देत या अभियानादरम्यान विविध प्रकारची झाडे लावून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमात ओमप्रकाश सोनटक्के साहेब वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा गणेश झामरे, शरद भस्मे, उमाकांत गौरकर आणि अशोक ढोक यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



वृक्षांचे महत्त्व :- निसर्गाचे खरे वाली
आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असताना वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. झाडे ही केवळ ऑक्सिजनचा स्त्रोत नाहीत, तर ती धरणीची खरी कवचकुंडल आहेत. लावलेली प्रत्येक रोपे ही भविष्यात मानवी जीवनाला प्राणवायू पुरवण्यासोबतच प्रदूषण मुक्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. वरोरा पोलीस प्रशासनाने केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक व पर्यावरण रक्षणाचे आपले कर्तव्य ज्या प्रकारे पार पाडले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
या उपक्रमामुळे परिसराला एक नवी व हरित दिशा मिळाली असून, नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाबाबत मोठी जनजागृती निर्माण झाली आहे.