चंद्रपूर, दि.11 :- 17 वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा ही 20 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत राहुरी जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हातील 17 वर्षाखालील मुला/मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक हायस्कुल, जिल्हा स्टेडीयम होणार आहे.
खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 नंतरचा असावा. (जन्म दाखला आवश्यक). निवड चाचणी करीता स्वत:ची किट आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो- 2 अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अहवान टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव विशाल चव्हाण यांनी केले आहे.




