Home जिल्हा पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे विविध खेळांचा आणि...

पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे विविध खेळांचा आणि योगासनांचा नियमित सराव सुरू.

वरोरा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “शिकतयं मन, घडतंय व्यक्तित्व!” या उद्देशाला समोर ठेवून विविध साप्ताहिक उपक्रम आणि नियमित खेळांचा सराव अत्यंत उत्साहात घेतला जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य देत रोज व नियमितपणे सर्व खेळांचा सराव करून घेतला जात आहे.



या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना पैलू पाडण्याचे काम अंशकालीन क्रीडा निदेशक  अमोल आवारी  हे करत आहेत, तर विद्यार्थ्यांमध्ये योगासनांची गोडी निर्माण करून त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योगासन प्रशिक्षक  आदित्य दावे  मार्गदर्शन करत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक  नगाजी साळवे  यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.



“शिस्त ही यशाची पहिली पायरी आहे” आणि “आरोग्य शरीर, आनंदी मन, यशस्वी जीवन” या वचनांना अनुसरून शाळा परिसरात योग व ध्यान, शिस्त, शिकवण आणि संस्कारांचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोथले, उपाध्यक्ष श्री.हुजूर शेंडे, सर्व सदस्यगण व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.पालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.