Home जिल्हा संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचे दिमाखात...

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

वरोरा :- संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचे अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. मानकचंदजी मालू विराजमान होते. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सीबीएसई निरीक्षक ज्योती हंकारे, अतुल जाट, मुकुंद झाला, राजेंद्रजी चिकटे, गणेशजी चवले, प्रवीणजी चिमुरकर, बजरंगजी वानखेडे, दिगंबरजी खापणे यांच्यासह शाळेच्या प्राचार्या रानी पटेल आणि उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती.



११०० खेळाडूंचा सहभाग आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार
या प्रतिष्ठित स्पर्धेत कर्नाटक, केरळ, बेंगळुरू, महाराष्ट्र, गोवा आणि दमण-दीव या विविध भागांतील  सुमारे ११०० खेळाडू आणि २०० प्रशिक्षक (कोचेस) मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना क्रीडावृत्तीने खेळण्याचे आवाहन केले. तसेच, अशा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.



💥 यशस्वी आयोजनासाठी परिश्रम 💥
स्पर्धेच्या यशस्वी आणि विनाविघ्न आयोजनासाठी शाळेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील शिक्षक अमोल आवारी, तहसीलदार यादव, पांडुरंग कुमरे, कोमल चांदेकर, घनश्याम खोंडे, सुमित बुटले, अनिल दगदाळ यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.
या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे संपूर्ण वरोरा परिसरात एक वेगळाच उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, साऊथ झोन स्तरावरील ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपले कौशल्य आणि क्रीडागुण राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याचे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे.