वरोरा :-वर्षानुवर्षे स्वतःच्या हक्काच्या जागेची प्रतीक्षा करणाऱ्या वरोरा शहरातील हजारो सर्वसामान्यांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. नगर भवन वरोरा येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना अधिकृत पट्टेवाटप करण्यात आले. या हक्काच्या पट्ट्यांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
“सामान्यांचे भविष्य सुरक्षित करणे हीच प्राथमिकता” जनप्रतिनिधींचा एल्गार
या महत्त्वाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. “सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून देणे आणि त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असा ठाम सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयामुळे वर्षानुवर्षे अनधिकृततेच्या टाचेखाली वावरणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या हक्काच्या घराची कायदेशीर पायरी आता पूर्ण झाली आहे.
🙏 मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 🙏
या कार्यक्रमाची धुरा आणि यशस्वी आयोजन वरोरा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार श्री. करणदादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढवली.
तसेच खालील अधिकारी आणि पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली:
अध्यक्षा :- सौ. अर्चनाताई ठाकरे (नगराध्यक्ष, वरोरा नगर परिषद)
प्रमुख अधिकारी :- मा. श्री. संदीप भस्के (उपविभागीय अधिकारी), मा. श्री. योगेश कोटकर (तहसीलदार), मा. श्री. सिद्धार्थ मेश्राम (मुख्याधिकारी, वरोरा नगरपरिषद)
उपाध्यक्ष सौ. योगिताताई नेरकर, गटनेते श्री. गजानन मेश्राम यांच्यासह विविध समित्यांचे सभापती (श्री. मनिष जेठाणी, श्रीमती मंगलाताई पिंपळकर, सौ. रोशनी भडके,श्री. गजानन जिवतोडे, श्री. राहुल देवडे, श्रीमती रेखाताई तेलतुंबडे, सौ. सुषमाताई चांभारे) आणि श्री. अक्षय भिवदरे, श्री. खेमराज कुरेकार, व इतर नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाला वरोरा नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, आदरणीय अधिकारी-कर्मचारी वर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे वरोरा शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून नगर परिषदेच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.




