Home क्राईम स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: घरफोडी करणाऱ्या आरोपीला छत्तीसगडमधून जेरबंद ; ३...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: घरफोडी करणाऱ्या आरोपीला छत्तीसगडमधून जेरबंद ; ३ लाखांची चोरीची रोकड जप्त.

चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातील बस स्टँड परिसरातील एका कार्यालयातून तब्बल ६ लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या अज्ञाताला स्थानिक गुन्हे शाखेने छत्तीसगड राज्यापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ३ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.



फिर्यादी  सौ. राकेश अवघडे (वय ४४ वर्षे, रा. डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा, चंद्रपूर) यांनी त्यांच्या बस स्टँड जवळील पॅलेस हॉटेल मागील कार्यालयातून ६,००,०००/- रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दिली होती.प्राप्त तक्रारीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. 956/2026, कलम 331(4) भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.



💥 पोलिसांची आक्रमक व तांत्रिक कारवाई 💥
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री. अमोल काचोरे यांनी एक विशेष तपास पथक तयार केले.
💥 तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि अत्यंत कौशल्याचा वापर करत संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय ३८ वर्षे, रा. रेंगाठेरा, पोस्ट डोंगरगाव, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याचे बस्तान छत्तीसगडमध्ये असल्याचे हेरले आणि त्याला यशस्वीरित्या ताब्यात घेतले.



💥 गुन्ह्याची कबुली व जप्ती 💥
कसून चौकशी केली असता आरोपीने 27/07/2026 रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ६ लाख रुपयांची चोरी केल्याची स्पष्ट कबुली दिली.
💥 पोलिसांनी पंचसमक्ष आरोपीच्या ताब्यातून ३,००,०००/- रुपये (अक्षरी रुपये तीन लाख फक्त) रोख रक्कम जप्त केली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.
💥 आरोपीला पुढील कायदेशीर Attachment पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. आहे.
💥 पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी 💥
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवासे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोलीस नाईक किशोर वाकडे व पोना. क्षेत्रांक बदाम यांच्या पथकाने पार पाडली.