Home राजकारण वरोरा-भद्रावती क्षेत्रात विकासाचे नवे पर्व; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आ. करणदादा...

वरोरा-भद्रावती क्षेत्रात विकासाचे नवे पर्व; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आ. करणदादा देवतळे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा.

वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आणि तडफदार आमदार माननीय करणदादा देवतळे यांच्या स्थानिक निवासस्थानी महाराष्ट्राचे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) माननीय डॉ. पंकजजी भोयर यांनी सदिच्छा भेट दिली. या उच्चस्तरीय भेटीमुळे वरोरा व भद्रावती मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात आणि विकासकामांच्या तत्त्वावर नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



या सदिच्छा भेटीदरम्यान दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, नव्याने प्रस्तावित विकासकामे आणि जनहिताच्या विविध ज्वलंत विषयांवर अत्यंत सविस्तर आणि सखोल चर्चा झाली. ग्रामीण भागाचा विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण क्षेत्राचा बळकटीकरण, गृहनिर्माण तसेच मतदारसंघातील जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.



विकासाला मिळणार छप्परफाड गती :- आ. करणदादा देवतळे
राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे वरोरा-भद्रावती क्षेत्रातील विकासकामांना निश्चितच अभूतपूर्व गती येईल, असा ठाम विश्वास यावेळी आमदार करणदादा देवतळे यांनी व्यक्त केला. मंत्री महोदयांचा हा दौरा या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा पत्थर ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते, युवा मोर्चा, महिला मोर्चा व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.