Home महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात योगासनाची महोत्सवी रणधुमाळी; जिल्हास्तरीय स्पर्धेचे २ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन!

चंद्रपूर जिल्ह्यात योगासनाची महोत्सवी रणधुमाळी; जिल्हास्तरीय स्पर्धेचे २ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन!

वरोरा :- योगासनपटूंसाठी एक आनंदाची व सुवर्णसंधी घेऊन  चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सज्ज झाली आहे. आगामी  २ ऑगस्ट २०२६ रोजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर  येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या महासंग्रामातून निवडले जाणारे हुकमी खेळाडू थेट राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



💥 स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये 💥
🙏 आयोजक :- चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन
👉 दिनांक :-२ ऑगस्ट २०२६
👉 स्थळ :- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
👉 उद्दिष्ट :- जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून त्यांना थेट  राज्यस्तरीय स्पर्धेची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे.



🙏वयोगट आणि प्रकार 🙏
प्रतिभावान खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे विविध वयोगट आणि थरारक प्रकारांत स्पर्धा पार पडणार आहेत.

💥 वयोगट 💥 वयोमर्यादा 💥

⭕ सब ज्युनिअर 👉 १० ते १४ वर्षे
⭕ ज्युनिअर  👉 १४ ते १८ वर्षे
⭕ सिनियर  👉१८ ते २८ वर्षे
⭕ सिनियर (A, B, C)  २८ ते ५५ वर्षे



💥 स्पर्धेचे ४ मुख्य प्रकार 💥
1. ट्रेडिशनल योगासन
2.आर्टिस्टिक योगासन (सिंगल)
3. आर्टिस्टिक योगासन (पेअर)
4. रिदमिक योगासन (पेअर)
महत्त्वाची नोंद आणि संपर्क
नावनोंदणीची अंतिम तारीख :- १ ऑगस्ट २०२६ (केवळ ऑनलाईन नोंदणी अनिवार्य)
👉 विशेष सूचना :- मुदतीत नावनोंदणी न करणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेत सहभाग दिला जाणार नाही, याची खेळाडूंनी नोंद घ्यावी.
🙏 अधिक माहिती व संपर्कासाठी 🙏
स्पर्धेविषयी अधिक माहिती हवी असल्यास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
👉 प्रा. तानाजी बायस्कर (सचिव) ☎️ ९५९४९०९९८१
👉 सारंग धनेगावकर (सहसचिव व संघटक) ☎️ ९८२३८९५१११

चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम योगासन खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि राज्यस्तरावर जिल्ह्याचा झेंडा रोखावा, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.