वरोरा :- आज सकाळी वरोरा शहरात नुकत्याच पार पडलेल्या भव्य ‘चातुर्मास प्रवेश रॅली’चे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या धार्मिक रॅलीत सहभागी झालेल्या हजारो भाविकांची तहान भागवण्यासाठी ‘रोटरी क्लब, वरोरा’ने पुढाकार घेत एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम राबविला. क्लबच्या नवीन कार्यकारणीच्या नेतृत्वाखाली भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
💠 नवीन कार्यकारणीची सक्रिय सुरुवात 💠
रोटरी क्लबच्या नवीन कार्यकाळाची धुरा सांभाळणारे अध्यक्ष रोटे. अभिजीत मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडला. रॅलीच्या मार्गावर स्वयंसेवकांनी तत्परतेने भाविकांना पाणी उपलब्ध करून दिले.
💠 प्रकल्पाचे यश 💠
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी मिळून रोटे. विशाल जाजू . रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. यावेळी रोटरी क्लबचे सचिव रोटे. अभिजीत बोथाले , ज्येष्ठ सदस्य रोटे. सुनील आयचित , रोटे. अमित नहार आणि रोट्रेक्ट क्लबचे अध्यक्ष विक्की आगलावे हे विशेष उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष अभिजीत मणियार म्हणाले की, “धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सेवा करणे ही रोटरीची संस्कृती आहे. रॅलीच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे.”
रोटरी क्लबच्या या आक्रमक आणि तत्पर कार्यशैलीमुळे वरोरा शहरात या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.




