Home Breaking News रोटरी क्लब वरोराच्या नवीन कार्यसमितीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

रोटरी क्लब वरोराच्या नवीन कार्यसमितीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

वरोरा :- रोटरी क्लब ऑफ वरोराचा भव्य पदग्रहण सोहळा शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी येथील कटारिया मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार कार्यक्रमात वर्ष २०२६-२०२७ साठीच्या नवीन टीमने अधिकृतपणे आपली जबाबदारी स्वीकारली.



💥 नवीन पदाधिकारी 💥
कार्यक्रमात रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि रोटरेक्ट क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदभार सोहळा पार पडला.
रोटरी क्लब ऑफ वरोरा :- रोटेरियन अभिजीत मणियार (अध्यक्ष), रोटेरियन अभिजीत बोथले (सचिव) आणि रोटेरियन सुनील अयाचित (कोषाध्यक्ष). यांनी मावळते अध्यक्ष रोटेरियन योगेश डोंगरावर आणि मावळते सचिव रोटेरियन राहुल पावाडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
👉 इनर व्हील क्लब :- श्रीमती स्नेहल पी. पट्टीवार (अध्यक्ष) आणि श्रीमती प्राजक्ता एम. कोहले (सचिव).
👉 रोटरेक्ट क्लब :- रोटरॅक्टर विकी एस. आगलवे (अध्यक्ष) आणि रोटरॅक्टर श्रेयांश फलोदिया (सचिव).
या सोहळ्याचे अध्यक्षपद रोटेरियन श्रीनिवास लेले यांनी भूषवले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद अध्यक्षा अर्चनाताई ठाकरे, श्री. मुकेशजी जीवतोडे आणि विद्या अविनाश रघुशे उपस्थित होते. रोटेरियन राजेश गढिकर यांनी अतिथी वक्ता म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.



🙏 सामाजिक बांधिलकीचा संकल्प. 🙏
नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन अभिजीत मणियार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येणाऱ्या वर्षात आमचा क्लब पूर्णपणे स्थानिक समाजाच्या गरजा पूर्ण करण्यावर आणि प्रभावी सेवा प्रकल्प राबवण्यावर भर देणार आहे.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव रोटेरियन अभिजीत बोथले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजन आणि स्नेहसभेने झाली. याप्रसंगी रोटरीच्या सदस्यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.