वरोरा :- गड्डमवार लेआउट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि भीतीचे वातावरण लक्षात घेता, नगरसेवक महेश मारोतराव जीवतोडे यांनी तातडीने आक्रमक पवित्रा घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला आणि त्वरित उपाययोजनांची मागणी लावून धरली.
महेश जीवतोडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, वन विभागाने दखल घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे.
“नागरिकांची सुरक्षितता ही माझी सर्वोच्च प्राथमिकता”
या प्रसंगी महेश जीवतोडे म्हणाले, “आमच्या परिसरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. बिबट्या आल्याची माहिती मिळताच मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करून पिंजरा लावण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण केली आहे. जनतेच्या हितासाठी मी प्रशासनाशी समन्वय ठेवून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास कटिबद्ध आहे.”
💠 नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना 💠
वन विभागाने पिंजरा लावला असला तरी, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
👉 गर्दी टाळा :-पिंजरा लावलेल्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका, जेणेकरून बिबट्याला येण्यास अडथळा येणार नाही.
👉 रात्रीच्या वेळी सतर्क राहाऋ:- रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा.
👉 सावधानता बाळगा :-लहान मुले आणि पाळीव जनावरांवर विशेष लक्ष ठेवा.
👉 सूचनांचे पालन :-वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी महेश जीवतोडे यांनी दाखवलेली ही तत्परता परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत मी सजग राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या परिसरातील अधिकृत अपडेट्ससाठी संपर्कात राहा.
जनसंपर्क कार्यालय, महेश मारोतराव जीवतोडे




