वरोरा :- आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर, वरोरा येथील श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने भव्य नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत हा भक्तिमय सोहळा पार पडणार असून, याद्वारे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
💠 सोहळ्याचे प्रमुख आकर्षण 💠
👉 सुरुवात :-१८ जुलै रोजी पहाटे ५:०० वाजता घटस्थापना आणि सकाळी ७:०० वाजता ध्वजारोहणाने सोहळ्याचा शुभारंभ होईल.
💠 नित्य कार्यक्रम 💠 १८ ते २५ जुलै दरम्यान दररोज सकाळी ६:०० वाजता श्रींची महापूजा, तर सकाळी ९:३० आणि सायंकाळी ६:३० वाजता नित्य भजन व महाआरती होईल.
👉 आध्यात्मिक मेजवानी :-या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन, गणेश अथर्वशीर्ष सामूहिक पठण, पालखी हरिपाठ आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम संपन्न होतील.
👉 सामाजिक उपक्रम :- बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत मोफत नेत्र आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात डॉ. निखिल लांबट आणि डॉ. स्नेहदीप रामटेके रुग्णांची तपासणी करणार आहेत.
भव्य सांगता :-२६ जुलै रोजी आषाढी द्वादशी निमित्त गोपाळकाल्याचे कीर्तन आणि श्रींच्या रथाची, तसेच माऊली-जगद्गुरूंच्या पालखीची भव्य शोभायात्रा निघणार आहे.
महाप्रसाद :- सोहळ्याची सांगता ३१ जुलै रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत होणाऱ्या महाप्रसादाने होणार आहे.
🙏 भाविकांना आवाहन 🙏
“सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा; मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा!” अशा शब्दांत भाविकांना साद घालत, श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान समितीने सर्व नागरिकांना या भक्तिमय सोहळ्यात आणि महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.




