Home जिल्हा वरोरा नगरीत भक्तीचा महासागर: हजरत बाबा ताजुद्दीन रह. यांच्या १०४ व्या उर्सा...

वरोरा नगरीत भक्तीचा महासागर: हजरत बाबा ताजुद्दीन रह. यांच्या १०४ व्या उर्सा निमित्त नेहरू चौकात ‘शाही लंगर’चे आयोजन

वरोरा :- वरोरा शहरात अध्यात्म आणि श्रद्धेचा एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. शहेनशाह-ए-हफ्त-ए-अकलीम हजरत सैय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन रह. यांच्या 104 व्या उर्साचे औचित्य साधून, वरोरा येथील नेहरू चौकात विशेष ‘शाही लंगर’ (महाप्रसाद) दिनांक :- 11/07/2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.




श्रद्धा आणि भक्तीच्या या पवित्र उत्सवात सर्व वरोरावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि भक्तीमय वातावरणाचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




कार्यक्रमाची रूपरेषा 👉 कार्यक्रम :- शाही लंगर (महाप्रसाद)

💠दिनांक :- 11/07/2026
💠 स्थळ :- नेहरू चौक, वरोरा 
💠 वेळ :- आज सायंकाळी 6 वाजल्यापासून
सर्व धर्मप्रेमी आणि नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन बाबांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.