चिमूर :- चिमूर येथील चर्चित वाहन जाळपोळ प्रकरणात आरोपी रोशन नथुजी राणे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन प्रदान केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS)कलम 326(f), 326(g) व 324(5) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर कलमांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली होती.
काय घडले न्यायालयात ?
सुनावणीदरम्यान, एडवोकेट मृणालिनी सी. रागीट यांनी न्यायालयाला पटवून दिले की, हे प्रकरण केवळ राजकीय किंवा वैयक्तिक वादातून सूडबुद्धीने दाखल करण्यात आले आहे. तपास अंतिम टप्प्यात असून महत्त्वाचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणाने परिसरात चर्चांना उधाण आले असून, पोलिसांच्या तपासावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
👉 “आरोपी रोशन राणे यांच्या बाजूने न्यायालयात प्रखर युक्तिवाद केल्यानंतर एडवोकेट मृणालिनी सी. रागीट.” न्याय हा न्यायमंदीरातच मिळतो व सत्याची नेहमी बाजू राखतो.




