वरोरा :-समाजातील गरजू आणि अपंग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांनी आज माणुसकीचे दर्शन घडविले. ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक भावनेतून त्यांनी दोन अपंग व्यक्तींना सायकलींचे वाटप करून त्यांना मोठा आधार दिला.
या उपक्रमांतर्गत सायकलचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये चिणोरा (पारधी टोला) येथील रहिवासी रवींद्र नन्नावरे आणि येंसा गावचे रहिवासी विठ्ठल पुसनाके यांचा समावेश आहे. शारीरिक व्याधीवर मात करून दैनंदिन कामे सुलभ व्हावीत, या उद्देशाने आमदार देवतळे यांनी ही मदत केली आहे.
याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हक्काच्या सायकली मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आमदार महोदयांच्या या संवेदनशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, उपस्थित गावकरी व लाभार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ🙏




