चंद्रपूर :- जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेची तीव्रता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता, जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्याचे आदेश दिले आहेत. आता सर्व शैक्षणिक संस्थांना सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज संपवावे लागणार आहे.
🟠 विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य🟠
सध्याच्या भीषण उन्हामुळे विद्यार्थ्यांना ‘सन स्ट्रोक’ (उष्माघात) आणि उष्णतेशी संबंधित इतर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाताना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे
🙏 आदेशाचे मुख्य मुद्दे 🙏
👉 वेळापत्रकात बदल :- जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित आणि खाजगी) शाळा व महाविद्यालयांना त्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करावा लागेल.
👉 वेळेची मर्यादा :- शैक्षणिक संस्थांना सकाळच्या सत्रात शाळा भरवून, जास्तीत जास्त सकाळी ११ वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
👉 सर्व संस्थांना लागू :-हे आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी हे आदेश जारी केले असून, शाळा-महाविद्यालयांना तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा निर्णय विद्यार्थी व पालकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.
🙏 जय विदर्भ🙏
👉 वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.




