Home जिल्हा जीवेत शरदः शतम्! वरोराच्या प्रसूतीतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुहास (काकू)विनायकराव वझे...

जीवेत शरदः शतम्! वरोराच्या प्रसूतीतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुहास (काकू)विनायकराव वझे यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

वरोरा :- वरोरातील प्रख्यात प्रसूतीतज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील दीपज्योती आणि लोक शिक्षण संस्थेच्या निस्सीम सभासद डॉ. सुहास विनायकराव वझे (काकू ) यांचा ८१ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा होत आहे. वयाच्या एका टप्प्यावरही वैद्यकीय आणि सामाजिक सेवा अविरत सुरू ठेवणाऱ्या काकूंना उदंड, आरोग्यदायी आणि निरामय आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा वरोरावासीयान कडुन व्यक्त होत आहे.



वैद्यकीय क्षेत्रात काम करताना केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता, डॉ. सुहासकाकू यांनी नेहमीच रुग्णांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते जपले. प्रसूतीशास्त्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे अनेक पिढ्या सुखरूप जन्माला आल्या आणि मातांना सुरक्षित आरोग्य लाभले. त्यांच्या याच निस्वार्थ आणि गुणी स्वभावामुळे वरोरा शहरात त्यांना केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक समजूतदार आणि मार्गदर्शक व्यक्ती म्हणून आदराचे स्थान आहे.
केवळ वैद्यकीय सेवेपुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता, डॉ. सुहासकाकू यांनी लोक शिक्षण संस्थेच्या, वरोरा माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. समाज प्रबोधन आणि शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व दाखवलेले सातत्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्यातील हा सामाजिक सेवेचा वसा आजही तितक्याच ऊर्जेने आणि तन्मयतेने सुरू आहे.



“काकू, आपल्या हातून सामाजिक सेवेचा वसा असाच अविरत चालू राहो आणि चांदण्यांची शीतलता अंगोपांग पसरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”



आपल्या या सुवर्णमहोत्सवी आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल समस्त वरोराकर हितचिंतकांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आपण असेच निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी राहो, हीच सदिच्छा.