वरोरा : – वरोरा तालुका धनेाजे कुणबी महिला आघाडीच्या वतीने शहरात तीन दिवसीय ‘आनंद मेळावा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २८, २९ आणि ३० मार्च २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन आज, शनिवार २८ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात (नगर परिषद समोर) हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, यानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी वरोडावासीयांना मिळणार आहे.
दिग्गजांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनेाजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट श्री. गजानन बोढाले भूषविणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन वरोडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. रवींद्रजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापति श्री. जयंत टेमुर्डे, सचिव श्री. कौरासे सर, श्री. बंडू भाऊ देऊळकर, समाजसेवक श्री. मुकेश जीवतोडे, श्री. अभय टोंगे, श्री. शिंदे साहेब, श्री. बोदाडकर साहेब, श्री. पंकज अंदनवार आणि श्री. कुंदन त्रिनग्रिवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सहभागाचे आवाहन
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकोप्यासाठी आयोजित या मेळाव्याला वरोडा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वरोडा तालुका धनोजे कुणबी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
🙏 जय विदर्भ🙏




