शिवशंभू ग्रुप, वरोरा यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन
वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशंभू ग्रुप, वरोरा यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी कार्यातून शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व पुस्तक वाटप करण्यात येणार असून, नुकत्याच निवडून आलेल्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून, नवीन आयुष्यमान कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. २० फरवरी २०२६ रोजी नगर भवन, यात्रा वार्ड , वरोरा येथे होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरोग्य शिबिरासाठी येताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
या उपक्रमाचे आयोजन संस्थापक हर्षल डोंगरे, कार्याध्यक्ष खुशाल बावणे, अध्यक्ष समीर किन्नाके , उपाध्यक्ष गौरव पोईनकर, सचिव चेतन कडूकर तसेच सदस्य सुमीत वनकर व योगेश किनारकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणारे हे उपक्रम समाजहिताचे असून, वरोरा शहरात सामाजिक एकात्मता व सेवाभाव दृढ करणारे ठरणार आहेत.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️9673574711
☎️8329889732




