Home जिल्हा ⭕🙏पी. एम. गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे साईडिंग प्रकल्पविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 🙏⭕

⭕🙏पी. एम. गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे साईडिंग प्रकल्पविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 🙏⭕

 

वरोरा :- दि. १२ फेब्रुवारी २०२६ :
पी.एम. गतिशक्ती योजनेअंतर्गत प्रस्तावित रेल्वे साईडिंग प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज वरोरा मार्गावरील एल.सी.एल. रेल्वे अंडरपास बांधकामस्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रकल्पग्रस्त व गावकऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे साईडिंगसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींच्या दुराबाबतचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष काम करताना अधिग्रहित जागेपेक्षा जास्त क्षेत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

याशिवाय, वाहतुकीस अपायकारक ठरणारा प्रस्तावित अंडरपास रद्द करण्यात यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता सुरू असलेल्या नाल्याच्या खोदकामावरही त्यांनी आक्षेप घेतला असून, संबंधित काम तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली.आणि मुरुमाचे अवैध उत्तखंन न करून, शासनाचा महसूल बुडवला असा आरोप आंदोलन करणाऱ्या नी केला, आहे, त्या अवैध उत्तखाना ची चौकशी करावी अशी मागणी केली

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विकासकामांना त्यांचा विरोध नाही; मात्र न्याय्य भरपाई, पारदर्शक प्रक्रिया आणि स्थानिकांच्या हिताचे संरक्षण या बाबींची पूर्तता झाली पाहिजे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न निकाली काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुढील घडामोडीकडे परिसरवासीयांचे लक्ष लागले आहे.