Home महाराष्ट्र ⭕🙏 महिलांसाठी दिलासादायक बातमी ! “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेतून एकही बहीण...

⭕🙏 महिलांसाठी दिलासादायक बातमी ! “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेतून एकही बहीण वंचित राहणार नाही 🙏⭕

वरोरा :- अभिषेक भागडे
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, काही लाभार्थी महिलांकडून eKYC करताना चुकांचे पर्याय निवडले गेल्याने त्यांचा लाभ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अशा सर्व महिलांसाठी आता दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

चुकीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणींना eKYC द्वारे माहिती दुरुस्त करण्याची आणखी एक संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणतीही बहीण या योजनेपासून दूर राहणार नाही, असा विश्वास शासनाने दिला आहे.

💻 eKYC दुरुस्तीची सुविधा ऑनलाइन उपलब्ध
महिलांना आता घरी बसून सहजपणे eKYC पूर्ण करता येणार असून त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
या लिंकवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महत्वाची सूचना:
eKYC करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळेत आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा खरा हेतू म्हणजे महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन देणे.
म्हणूनच शासनाने दाखवलेली ही संवेदनशीलता महिलांच्या मनाला स्पर्श करणारी आहे.

सर्व महिलांनी ही माहिती इतर बहिणींनाही जरूर कळवावी, जेणेकरून एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही.

🙏🏻जय विदर्भ 🙏🏻बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732