Home विदर्भ देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत

नागपुरात महिलांकडून टेकडी गणपतीला साकडं

नागपूर (Nagpur):- नागपूरातील महिलांनी राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, यासाठी टेकडी गणपती मंदिरात प्रार्थना केली. मोठ्या संख्येने एकत्र येत, महिलांनी गणपतीच्या चरणी साकडे घालत त्यांच्या इच्छांची पूर्तता करण्याची मागणी केली.

महिलांनी या वेळी फुलांनी सजवलेल्या गणेशमूर्तीसमोर दीप प्रज्वलन केले आणि भक्तिभावाने स्तोत्र पठण केले.
या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी हातात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामांचा आढावा सांगणारे फलक होते.

“देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूरचे भूषण असून त्यांच्या कार्याने देशपातळीवर राज्याचा गौरव वाढवला आहे. त्यामुळे आम्ही टेकडी गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची विनंती करीत असल्याचे महिलांनी सांगितले.

Nagpur is famous for
Nagpur election result 2024
Live nagpur
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
Nagpur map
Nagpur city area in sq km
Nagpur city population