Home महाराष्ट्र शिंदेंचा राजीनामा;पुढचा मुख्यमंत्री कोण?

शिंदेंचा राजीनामा;पुढचा मुख्यमंत्री कोण?

खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली (New Delhi) :- विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी एकनाथ शिंदेंसह महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते राजभवनावर दाखल झाले होते.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपावला.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Ekanath Shinde) राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपावला.सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांची इच्छा आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा, त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आता मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे, परंतु एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.एकनाथ शिंदे पुढे मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहावे, ही अनेकांची इच्छा आहे. यासाठी शिवसेना पक्ष देखील जोर देत असून अनेक ठिकाणी पूजा अर्चा आणि होम हवन देखील केले गेले आहेत.शिवसेनेच्या आमदारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच बसवावं, यासाठी भाजपकडे मागणी केली गेली.

New Delhi Railway station
New Delhi Pin Code
New Delhi AQI
New Delhi areas
New delhi vs delhi
Flights to New Delhi
delhi.gov.in login
Is Delhi a state