वरोरा :- महादेव मंदिर देवस्थान व श्रीमद् भागवत सप्ताह कमिटीच्या वतीने दि. २३/१२/२०२६ ते दि. ३०/१२/२०२६ या कालावधीत मालविय वॉर्डातील नगर परिषद ग्राऊंड येथे भव्य श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, थोर साधुसंतांच्या आशीर्वादाने, ह.भ.प. श्री. नवरुद्रशेष महाराजांच्या प्रेरणेने तसेच गावकरी मंडळींच्या सहकार्याने हा सोहळा होत असून भाविकांनी हरिनाम अमृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सप्ताहाचा प्रारंभ ‘कलश स्थापना विना’ ब्रह्म मुहूर्तावर सकाळी ७.०० वाजता श्री. शेष महाराज यांच्या शुभहस्ते होईल. कथा प्रवक्ते म्हणून ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज मदने (आळंदी दे., ता. खेड, जि. पुणे) यांची वाणी लाभणार असून पहिले सत्र सकाळी ९ ते ११ आणि दुसरे सत्र सायंकाळी ८ ते १० या वेळेत होईल. ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प. श्री. निलेश महाराज टेंभरे व ह.भ.प. श्री. जिवन महाराज काम पाहतील.दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन पहाटे ५ ते ६, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ६.३० ते ८, श्रीमद् भागवत कथा सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ८ ते ११ आणि हरिपाठ सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होईल.
वादक व गायक मंडळीमध्ये गायक ह.भ.प. श्री. गजानन म. बावणे (मु. समुद्रपूर), ऑर्गन ह.भ.प. श्री. दुर्वास म. कोसेकर (मु. भंडारा), पॅड ह.भ.प. श्री. कोमल म. दाणी (मु. किन्ही), तबला ह.भ.प. श्री. खुशाल म. निंजावे (मु.) आणि झांकीकार ह.भ.प. श्री. परमानंद म. नेहारे (मु. मुरपाड) असतील. हरिपाठ मंडळीत विणेकरी ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम म. चौधरी (साकोली, ता. वरोरा), मृदंग वादक ह.भ.प. श्री. प्रफुल म. राऊत (मुरपाड, सेलू) व गायक ह.भ.प. श्री. आकाश म. वैद्य सेवा देतील. पहारेकरी म्हणून ह.भ.प. श्री. भगवानजी म. भाळशंकर व ह.भ.प. श्री. बबनजी म. जवादे, तर टाळकरी मंडळीत ह.भ.प. श्री. आकाश म., जिवन म., निलेश म., सोपान म., तुषार म., पवन म., आनंद म. व इतर सर्व मंडळी सहभागी होतील.
दि. २७/१२/२०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ह.भ.प. श्री. खुशाल म. वैद्य (नागपूर) यांचे भारूड होईल. दि. ३०/१२/२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता भागवत ग्रंथ व दिंडी सोहळा तसेच महाप्रसाद आयोजित केला आहे. काल्याचे कीर्तन ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज मदने यांचे दुपारी १२ ते २ या वेळेत होऊन त्यानंतर समस्त गावकरी मंडळी वरोरा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन आहे.
सप्ताहातील पंगतीचे अन्नदाते पुढीलप्रमाणे : बुधवार (२३/१२/२०२६) सायंकाळी जेवण – अरुण चौधरी. गुरुवार (२४/१२/२०२६) दुपारी जेवण – किसनजी पेंदोर, सायंकाळी जेवण – दिपक आकुलवार, नाश्ता – मंगेश नक्षीने. शुक्रवार (२५/१२/२०२६) दुपारी जेवण – मयुर खिरटकर, सायंकाळी जेवण – बंडूजी लभाने, नाश्ता – नागराज पेंदोर. शनिवार (२६/१२/२०२६) दुपारी जेवण – विजयजी पानघाटे, सायंकाळी जेवण – त्रिलोक दुर्गा उत्सव महिला मंडळ, नाश्ता – प्रेमदास खिरटकर. रविवार (२७/१२/२०२६) दुपारी जेवण – अशोकजी घोडमारे, सायंकाळी जेवण – दिलीपजी तडस, नाश्ता – हनुमान ठेंगणे. सोमवार (२८/१२/२०२६) दुपारी जेवण – फकरुजी जोगी, सायंकाळी जेवण – लखन केशवाणी, नाश्ता – कमलाकरजी भोयर. मंगळवार (२९/१२/२०२६) दुपारी जेवण – भागवत सप्ताह समिति, सायंकाळी जेवण – गणेश मेश्राम, नाश्ता – विशाल बलगेवार.
यशस्वीतेसाठी नवयुवक तरुण मंडळ, जय श्री गणेश मंडळ व जगन्नाथ महिला भजन मंडळ (मालविय वॉर्ड, वरोरा) संयोजक म्हणून परिश्रम घेत आहेत.





