29 November 2026News Website

गडचिरोली–सावली मार्गावर किसाननगर येथे बस पलटी; ८ प्रवासी किरकोळ जखमी

 

गडचिरोली / सावली (वार्ताहर) : गडचिरोली ते सावली मार्गावरील किसाननगर परिसरात प्रवासी बस पलटून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ८ नागरिक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

जखमींमध्ये पल्लवी आस्तिक दुधे, अयान आस्तिक दुधे, प्रियांश आस्तिक दुधे (सर्व रा. सावली), ज्योती चरणदास मडावी, आशिष चरणदास मडावी (दोघेही रा. पावी मुरांडा), रघुराज बाजीराव शेडमाके, नथूजी नारायण शेडमाके (दोघेही रा. हिरापूर) आणि इंदुबाई गौतम बांबोडे (रा. घोडेवाही) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर टोल नाक्याच्या ॲम्बुलन्सद्वारे सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी कॉम्प्लेक्स हॉस्पिटल येथे नेण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

अभिषेक किशोर भागडे