29 November 2026News Website

नवजात अर्भकाचा जीव वाचवून वरोरा पोलिसांची संवेदनशील कामगिरी; गुपनीय माहितीवरून मातेचा शोध घेत कारवाई

वरोरा :- मौजा फत्तापूर येथे सुमारे ५ ते ६ तासांच्या नवजात बाळाला टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला आपल्या ताब्यात घेतले आणि तत्काळ उपचारासाठी वरोरा येथील रुग्णालयात दाखल केले.

बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरोरा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही वेळातच संबंधित मातेचा शोध घेऊन तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा येथील तपासी अधिकारी एपीआय गणेश झांबरे हे करत आहेत.

संकटात सापडलेल्या एका निष्पाप नवजात जीवाची समयसूचकता आणि तत्परतेने काळजी घेत, तसेच तपासाची सूत्रे गतिमान ठेवून मातेचा शोध घेतल्याबद्दल वरोरा पोलिसांच्या या संवेदनशील व कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

अभिषेक किशोर भागडे