वरोरा, २४ नोव्हेंबर :-ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय, वरोरा येथे पार पडलेल्या निवडणुकीत एकरे पॅनलने दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवत संपूर्ण पॅनल निवडून आणले आहे.श्री. देवीदास नारायण कष्टी,श्री. दिनकर सीताराम ठेंगणे,श्री. गोपाल घनश्याम एकरे,श्री. नानाजी कृष्णाजी जुनघरे,श्री. प्रमोद मोतीराम साळवे,श्री. रामभाऊ बापुराव ऐकर,श्री. शंकर अंबादास गौरकार,श्री. सोनबा महादेवराव भोंगळे,श्री. उत्तमराव श्रीहरी झाडे सौ. रेखा अरविंद कुरेकार हे उमेदवार निवडून आले आहे.या निवडणुकीत देवतळे पॅनल आणि एकरे पॅनल यांच्यात लढत झाली.सर्वच्या सर्व दहा जागांवर एकरे पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट होताच समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मतदारांनी एकरे पॅनलच्या बाजूने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर संस्थेचे नवीन अध्यक्ष श्री. गोपाळ घनश्याम एकरे, उपाध्यक्ष श्री. सोनबा महादेवराव भोंगळे,सचिव श्री. दिनकर सीताराम ठेंगणे पदी विराजमान झाले आहे, सर्वांना शुभेच्छा देण्यात आले आहे.





