29 November 2026News Website

प्रभाग क्रमांक १ मध्ये स्वच्छतेचा धडाका; विकासकामांसोबत स्वच्छतेलाही सर्वोच्च प्राधान्य!

भद्रावती :- “आपला प्रभाग – आपली जबाबदारी, स्वच्छ प्रभाग – सुंदर प्रभाग!” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत भद्रावती नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये स्वच्छता अभियानाला जोरदार गती देण्यात आली आहे. नगराध्यक्ष मा. श्री. प्रफुल भाऊ चटकी व आरोग्य सभापती रेखाताई खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांचे उत्तम आरोग्य, उच्च दर्जाची स्वच्छता आणि परिसराचे सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने छत्रपती कॉलनी, गौतम नगर, बुद्ध विहार, व्यायामशाळा परिसर, बाळासाहेब प्रवेशद्वार, देवगडे हॉस्पिटल परिसरासह संपूर्ण प्रभागात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.



🙏 प्रत्यक्ष कामातून सेवेला प्राधान्य 🙏

केवळ कागदी आश्वासने न देता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्यावर प्रभागाचे नगरसेवक महेश मारोतराव जीवतोडे यांनी नेहमीच भर दिला आहे. प्रभागातील प्रत्येक गल्ली, रस्ता आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

“स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांचे समाधान, प्रभागाचा विकास आणि स्वच्छतेचा ध्यास हेच आमच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे.”  महेश मारोतराव जीवतोडे, नगरसेवक, नगरपरिषद भद्रावती विकासाच्या नवनवीन कामांसोबतच मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक १ मधील गौतम नगर व परिसरातील नागरिकांमधून नगरसेवकांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

अभिषेक किशोर भागडे