वरोरा :- दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त वरोरा विधानसभा क्षेत्राचे लाडके आणि लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांनी आज सायंकाळी वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रत्यक्ष फेरीत व्यापारी बांधवांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या.
या विशेष जनसंपर्क दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ७:३० वाजता शहरातील मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन मार्केट येथून झाली. आमदार करणदादा देवतळे यांनी मार्केटमधील प्रत्येक दुकानात जाऊन व्यापारी बांधवांचे पुष्पगुच्छ व दीपावलीच्या गोड शब्दांत स्वागत स्वीकारले आणि त्यांच्या व्यवसाय व आरोग्याची विचारपूस केली. या वेळी व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
या जनसंपर्क आणि शुभेच्छा दौऱ्यात भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💥 उपस्थित प्रमुख संघटन 💥
- भारतीय जनता पार्टी (भाजप)
- भारतीय जनता युवा मोर्चा
- भारतीय जनता महिला आघाडी
- विविध आघाड्यांचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार करणदादा देवतळे यांच्या या उत्साहपूर्ण भेटीमुळे वरोरा शहरातील व्यापारी वर्गात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.





