” लोकप्रिय आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांचे श्रमदान भूजलपातळी वाढवण्यासाठी गावकऱ्यांची एकजूट “
चांदापूर :- भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि परिसरातील भूजलपातळी वाढवण्यासाठी चांदापूर येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. आमदार मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण जलसंधारण उपक्रम उत्साहात पार पडला.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, विहिरी व कूपनलिकांची पातळी वाढवणे या मुख्य उद्देशाने गावकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून हा बंधारा उभारला. आमदारांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे काम पूर्ण करून जलपूजन करण्यात आले.
🙏 प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती 🙏
या उपक्रमास भाजपचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
- श्री. विजय बैस (तालुकाध्यक्ष, भाजप घाटंजी)
- सौ. वर्षाताई पेंदोर (अध्यक्षा, भाजप महिला आघाडी)
- श्री. नरेश पेंदोर
- श्री. रत्नाकर काका गावंडे
- श्री. नंदू महल्ले
- श्री. सचिन देहेणकर
💥 समृद्ध गावासाठी सामूहिक प्रयत्न 💥
“जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि समृद्ध गावासाठी सामूहिक प्रयत्न” ही संकल्पना चांदापूरकरांनी प्रत्यक्ष कृतीत आणून इतर परिसरासाठी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. गावकऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.





