वरोरा (दि. ७):- वरोरा शहरात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी नगर परिषदेतर्फे विकासकामांना वेग देण्यात आला आहे.प्रभाग क्रमांक 5 मधे दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी वरोरा शहरात दोन वेगवेगळ्या भागांत नवीन हँडपंप (बोर) बसविण्याच्या भूमिपूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले.
या ठिकाणी झाले भूमिपूजन :- १. लक्ष्मी नगर, बुरान ले-आऊट, हनुमान मंदिर ओपन स्पेस २. वैष्णव नगर, ओपन स्पेस, हनुमान मंदिर, मोहबाळा रोड, वरोरा
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती :- या भूमिपूजन सोहळ्यास चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच वरोरा नगर परिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे, उपाध्यक्ष सौ. योगिताताई भारत नेरकर, न.प. गटनेते श्री. गजाननजी मेश्राम, नगरसेवक तथा प्रा.पु. सभापती श्री. गजानन जीवतोडे, नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके, माजी नगराध्यक्ष श्री. अहेतेशामजी अली, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. विलासभाऊ टिपले यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी नगर परिषदेचे इतर आदरणीय सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच प्रभाग क्षेत्रातील मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व बंधू-भगिनी उपस्थित होते. नवीन हँडपंप सुरू होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.





