Home राष्ट्रीय आत्मा आणि समाजसेवेचा सुवर्णयोग :आर्णी-केळापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी घेतली गुरुदेव श्री....

आत्मा आणि समाजसेवेचा सुवर्णयोग :आर्णी-केळापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी घेतली गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांची भेट.

बंगळुरू :- राजकारणातील सक्रिय प्रवासाला अध्यात्माची आणि लोककल्याणकारी विचारांची जोड देत, आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके  आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी नुकतीच बेंगळुरू येथील जागतिक पातळीवरील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर’ला सदिच्छा भेट दिली. या अत्यंत मंगलमय वातावरणात त्यांनी जागतिक आध्यात्मिक गुरु परमपूज्य श्री. श्री. रविशंकरजी यांची भेट घेऊन त्यांचे अनमोल आशीर्वाद घेतले.
या उच्च आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या सविस्तर भेटीदरम्यान, गुरुदेवांसोबत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक विषयांवर अत्यंत सखोल व मनमोकळी चर्चा झाली. जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मकता कशी रुजवावी, सेवाभावाचा विस्तार कसा करावा आणि मानवतेच्या सर्वोच्च भावनेतून लोककल्याणाची वाटचाल कशी अधिक दृढ करावी, याबाबत गुरुदेवांचे बहुमूल्य मार्गदर्शन श्री. राजूभाऊ तोडसाम यांना लाभले.



राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना केवळ सत्तेचे राजकारण नव्हे, तर तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा ओलावा पोहचवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे, या विचाराला या भेटीमुळे अधिक बळकटी मिळाली आहे. परमपूज्य गुरुदेवांचे उच्च विचार आणि त्यांच्या अतुलनीय सेवाभावाच्या प्रेरणेमुळे आर्णी-केळापूर मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी सदैव आणि निष्ठेने कार्यरत राहण्याचा दृढ संकल्प राजूभाऊ तोडसाम यांनी यावेळी व्यक्त केला.
मानवतेची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा मानत, या आध्यात्मिक भेटीने एका जनसेवकाच्या कारकिर्दीत नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार केला असून, संपूर्ण मतदारसंघात या सुसंवादाचे आणि अध्यात्मिक भेटीचे सर्वत्र स्वागत होत आहे. 🚩