वरोरा :- वरोरा येथील जलाराम सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, जिल्हाध्यक्ष भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रट आणि युवा नेते आशिष रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात हजारो नवीन कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला.
अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक व जनहिताच्या योजनांचा विशेष उल्लेख करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पिकाचे कर्ज माफ होऊन त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला होता. तसेच सर्वसामान्यांना अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना ही राज्यभरात अत्यंत लोकप्रिय ठरली, ज्याचा लाभ गरिबांना झाला. याशिवाय, ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना, महिला सक्षमीकरण आणि कोरोना काळात राबविलेले ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे आरोग्य अभियान अशा अनेक लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून थेट सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले होते. शिवसेना ही नेहमी वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे, असे प्रतिपादन नेत्यांनी केले.
💥 आगामी निवडणुकीची रणनीती💥
👉 तळागाळात संघटन बांधणी :- प्रत्येक गावात आणि बुथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.
👉 जनहिताचे मुद्दे :- वरोरा व चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक विकासकामे, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून लढा उभारला जाईल.
महिला व तरुणांचा सहभाग :- आगामी निवडणुकीत महिला आणि तरुण कार्यकर्त्यांना सक्षम जबाबदाऱ्या देऊन प्रभावी मोर्चेबांधणी केली जाईल.
👉 प्रत्येक घरापर्यंत संपर्क :- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातील लोकाभिमुख योजनांचा प्रचार करत घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवली जाणार आहे.
या नियोजनबद्ध रणनीतीमुळे आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.




