Home Breaking News वेगळ्या विदर्भासाठी एल्गार: नागपूर कराराच्या प्रतीकात्मक होली आंदोलनाचे चंद्रपुरात तुफान आयोजन!

वेगळ्या विदर्भासाठी एल्गार: नागपूर कराराच्या प्रतीकात्मक होली आंदोलनाचे चंद्रपुरात तुफान आयोजन!

चंद्रपूर :-“वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!” या ठाम निर्धारासह आणि विदर्भाच्या हक्काच्या लढा तीव्र करण्यासाठी ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराअंस)’ यांच्या वतीने चंद्रपुरात एका आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विदर्भाच्या अस्तित्वावर अन्याय करणाऱ्या नागपूर कराराच्या प्रतीकात्मक होळीचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून शासनाचा तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे.

💥 आंदोलनाचे मुख्य मुद्दे व ठळक वैशिष्ट्ये 💥

  • विषय: नागपूर करार होली आंदोलन (नागपूर करार दि. २८ सप्टेंबर १९५३).
  • मुख्य नारा: “विदर्भ महाराष्ट्र नाही! स्वतंत्र राज्य पाहिजे!” आणि “विर्भाचा स्वाभिमान जपुया!”
  • दिनांक: २८ सप्टेंबर २०२६ (सोमवार)
  • वेळ: सकाळी ११ वाजता
  • ठिकाण: जटपुरा गेट, जिल्हा – चंद्रपूर

💥 स्वाभिमानाचा लढा तीव्र होणार 💥

विदर्भाच्या हक्कांवर झालेला अन्याय आता खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर कराराला जाळून आपला तीव्र रोष व्यक्त करण्याचे ठरवले आहे. “विदर्भाच्या हक्कांवर झाला, नागपूर कराराला जाळा! स्वतंत्र विदर्भासाठी लढा!” हा नारा देत विदर्भातील तमाम जनतेला व कार्यकर्त्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“चला, मोठ्या संख्यने सहभागी होऊ!” असे आवाहन करत विदर्भप्रेमींनी या ऐतिहासिक आंदोलनाची तयारी वेगात सुरू केली आहे.

जय विदर्भ! जय किसान! जय युवा!