Home Breaking News वरोरा तालुक्यात संतापजनक घटना,ड्रेससाठी पैसे न दिल्याच्या रागातून २८ वर्षीय विवाहितेचे टोकाचे...

वरोरा तालुक्यात संतापजनक घटना,ड्रेससाठी पैसे न दिल्याच्या रागातून २८ वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल विष प्राशनामुळे मृत्यू

वरोरा (चंद्रपूर) :- ड्रेस खरेदीसाठी पतीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या २८ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येवती (ता. वरोरा) येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महिलांच्या वाढत्या मानसिक तानावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



💥 काय आहे नेमकी घटना 💥

प्राप्त माहितीनुसार, मृत महिला सौ.मोनाली ओमप्रकाश साळवे (वय २८, रा. येवती, ता. वरोरा) हिने काल दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्याला ड्रेस घेण्यासाठी पैसे हवे असल्याचा हट्ट धरला होता. मात्र, पतीने पैसे देण्यास नकार दिल्याने ती प्रचंड रागात होती. याच रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलत घरात उपलब्ध असलेले विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने तिला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.



💥 दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले💥

या दुर्घटनेत मोनाली हिच्या पाठीवर दोन लहान मुले आहेत. आईच्या अचानक आणि दुर्दैवी जाण्याने त्या चिमुरड्यांचा आधार हिरावला गेला असून, कुटुंबावर आभास कोसळला आहे. एका क्षणी आलेल्या रागातून आणि कौटुंबिक वादातून घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला.



💥 पोलिसांचा तपास वेगात 💥

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याच्या सध्याच्या कर्तव्यदक्ष एपीआय लक्ष्मी चौधरी आणि त्यांची तपास पथक तातडीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. कौटुंबिक कलह आणि क्षुल्लक कारणांवरून टोकाची भूमिका घेणाऱ्यांवर प्रबोधन करण्याची गरज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.