Home जिल्हा गोंडवाना विद्यापीठाचा ‘ उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार ’ मयुर बुरांडे यांना जाहीर २...

गोंडवाना विद्यापीठाचा ‘ उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार ’ मयुर बुरांडे यांना जाहीर २ ऑक्टोंबर ला विद्यापीठात होणार सन्मान.

वरोरा :- गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थी मयुर बुरांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विद्यापीठाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.



गोंडवाना विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यापिठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच विद्यापीठातील मान्यवर अधिकारी व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहून मयुर बुरांडे यांचा त्यांच्या सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.मयुर बुरांडे यांनी महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची विद्यापीठाने दखल घेत उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी निवड केली आहे.



या पुरस्कारामुळे आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मयुर बुरांडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.