Home जिल्हा चंद्रपूरच्या विकासाला गती! जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. लोककल्याणकारी...

चंद्रपूरच्या विकासाला गती! जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. लोककल्याणकारी कामांना मिळणार निधीचा हातभार.

चंद्रपूर :- स्थानिक जनतेच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवत चंद्रपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीच्या प्रभावी आणि पारदर्शक वापराचा संकल्प सोडण्यात आला आहे. आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यात प्रस्तावित आणि प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. खनिज क्षेत्रातील निधीचा योग्य वापर करून जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक कायापालट करण्याचे धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.



💥 बैठकीतील ठळक मुद्दे 💥
पारदर्शकता व प्रभावी वापर :- खनिज निधीचा अधिकाधिक लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकासकामांना गती देण्याचे निर्देश.
लोकोपयोगी कामांना प्राधान्य :-आरोग्य, शिक्षण, रस्ते, आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर.
सर्वपक्षीय उपस्थिती :- जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येत विकासाच्या मुद्यावर साधली चर्चा.



🙏 दिग्गजांची प्रभावी उपस्थिती 🙏
या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीस चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  मा. प्रा. डॉ. अशोक उईके आणि जिल्हाधिकारी  मा. वसुमना पंत यांच्या प्रमुख उपस्थितीसह लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
👉 उपस्थित प्रमुख मान्यवर
⭕ मा. प्रतिभाताई धानोरकर (संसद सदस्य / खासदार)
⭕ मा. श्री. सुधीर मुनगंटीवार (आमदार)
⭕ मा. श्री. विजय वडेट्टीवार (आमदार)
⭕ मा. श्री. किशोर जोरगेवार (आमदार)
⭕ मा. श्री. करणदादा देवतळे (आमदार)
⭕ मा. श्री. देवराव भोंगळे (आमदार)
⭕ मा. श्री. अभिजीत वंजारी (आमदार)
⭕ मा. श्री. हेमंत पाटील (आमदार)
⭕ मा. श्री. सुधाकर अडबाले (आमदार)
तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुलकित सिंग , महानगरपालिका आयुक्त श्री. अखनुरी नरेश , जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. खनिज प्रतिष्ठानच्या निधीचा पाईन्-पाईन् जनतेच्या कल्याणासाठी आणि पारदर्शक पद्धतीने खर्च व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.”