गडचिरोली / चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर–येणापूर परिसरातील तब्बल २६ गावांमधील १६०४.६२ हेक्टर खासगी शेतजमिनीच्या प्रस्तावित भूसंपादनावरून स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वर असलेला दृढ विश्वास आणि पक्ष नेते राजु उंबरकर यांच्यावर देखील विश्वासार्हता असल्याकारणाने सदरील गावाच्या ग्रामस्थांनी राजु उंबरकर यांना हि माहिती देऊन गावामध्ये भेट देण्याची मागणी केली, या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी वणीहून थेट गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर गाव गाठत बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रश्न मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
ग्रामस्थांच्या आवाहनानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी तात्काळ येणापूर येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरच २६ गावांतील सरपंच, उपसरपंच, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल आणि यानंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांना दिली जाईल. गरज पडल्यास राज साहेबांना स्वतः या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी स्पष्ट केले. लॉयड्स कंपनीसाठी MIDC च्या नावाखाली चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर–येणापूर परिसरातील तब्बल १३ गावांमधील औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाच्या खूप तक्रारी आल्या आहेत. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी दबावाचा आरोप करत MIDC च्या नावाखाली जमिनी संपादित करून, पुढील काळात ही जमीन लॉयड्स Lloyds कंपनीच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रक्रीयेमागे स्थानिक नेत्यांचे आणि संबंधित घटकांचे संगनमत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बाधित होणारी २६ गावे आणि शेतकऱ्यांची भीती या भूसंपादन प्रक्रियेचा फटका परिसरातील या २६ गावांना बसणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, शेतकऱ्यांनी मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या समोर मुख्य चिंता व्यक्त केल्या या जमिनींवर सिंचनाची उत्तम सुविधा असून वर्षातून २ ते ३ पिके घेतली जातात. जमीन गेल्यास हजारो कुटुंबांच्या जीवनाचा आधारच हिरावला जाईल, ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून आहेत.
भूसंपादनामुळे शेतकरी थेट भूमिहीन होण्याची भीती आहे आणि सदर भाग हा आदिवासी लोकांचा असून देखील येथील आदिवासी लोक दहशतीच्या वातावरणामध्ये असून, यांना आज देखील अशाप्रकारे धमकावले जात आहे,
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे आतापर्यंत कोणत्याही प्रमुख राजकीय नेत्याने गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र,मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांनी थेट गावात येऊन ऐकून घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कुणी आमचे म्हणणे ऐकले नाही, पण आता आमच्या प्रश्नाला योग्य व्यासपीठ आणि आवाज मिळाला आहे स्थानिक ग्रामस्थांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी सरपंच सुधाकर गददे, उपसरपंच जीवन्दास भोयर, सुरेश गुंतीवार, रोषण परसोडे, कुणाल ठेंगणे, रमेश संघावर, मनसे चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्र साडवे, सोनल वाकुलकर, विध्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई, सोशल मिडिया अध्यक्ष राज गुडेकर, अंकुश संतोषवर, आकाश कुद्मेथे, पवन कौसलकर, डॉ.गटपल्लीवार, शुभम भांडेकर, सचिन येमप्रेडीवार व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




