वरोरा :- लोकशिक्षण संस्था अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व नगर परिषद,वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने व शुभम नगर,वरोरा यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 28 जुलै 2026 रोजी शुभम नगर,हनुमान मंदिर परिसरात घेण्यात आला.
आधुनिक काळात पैशाच्या संपत्तीबरोबरच वृक्षांची संपत्ती वारसांना देणे अत्यावश्यक आहेत.अशा व्यापक विचारहेतुने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वृक्षारोपणाकरिता स्वयंसेवकांची रॅली महाविदयालयातुन शुभम नगरमधील हनुमान मंदिरात पोहोचली.तिथे विविध वृक्षाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले व पुढे महाविद्यालयात रॅली आल्यानंतर प्रती विद्यार्थी -एक वृक्ष याप्रमाणे रोपांचे वितरण व वृक्षसंवर्धनाबाबत माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचे नियोजन विद्यापीठानी सुचविले आहेत,
राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व वनविभागाच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाला वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हा उपक्रम देण्यात आला.यासाठी शैक्षणिक संस्थांना प्रति रोप एक रुपया दराने शंभर रोपे वनविभागाच्या रोपवाटिकेतून उपलब्ध करून देण्यात आले .
या उपक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयाने मोवाळा येथील शासकीय रोपवाटिकेतून दोनशे रोपे आणून वृक्षारोपण व वृक्षारोपांचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरविले आहे.याअनुषंगाने 25 जुलै 2026 ला महाविद्यालयात सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला मोहन ताजने, संदीप भडके(सामाजिक कार्यकर्ते ) वसंता ठावरी, पारखी ,उल्हास लोखंडे (नायब तहिसीलदार, वरोरा ),गायत्री खोके,कोरडे इत्यादी शुभम नगर येथील नागरिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक , नगर परिषदेचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.तसेच अमर बिरिया(स्वच्छता निरीक्षक) तृप्ती लाडे(शहर समन्वयक) व सर्वांचे सहकार्य मिळाले.




