वरोरा :- देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या कारगिल युद्धातील अमर शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वरोरा येथे ‘कारगिल विजय दिवस’ मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात येणार आहे. २६ जुलै रोजी आयोजित या विशेष कार्यक्रमाद्वारे वीर जवानांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला उजाळा दिला जाणार आहे.
🙏कार्यक्रमाचे नियोजन 🙏
‘जय जवान जय किसान आजी माजी सैनिक संस्था, वरोरा’ यांच्या वतीने या दिवशी दोन मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
👉 शौर्य रॅली :- सकाळी ८:३० वाजता ‘शहीद चौक, वरोरा’ येथून रॅलीला सुरुवात होईल.
👉 देशभक्ती कार्यक्रम :- सायंकाळी ५:०० वाजता ‘अनुबंध हॉल, वनी बायपास रोड, वरोरा’ येथे देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन वीर जवानांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजक ‘जय जवान जय किसान आजी माजी सैनिक संस्था, वरोरा’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.




