वरोरा :- भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय युवा आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
आमदार साहेबांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयात (एलआयसी ऑफिसजवळ, मोहबाळा रोड) सकाळी 11 वाजता या शिबिराची सुरुवात झाली. या शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार ब्लड,नागपुर बँकेचे विशेष सहकार्य लाभले.
समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत, या शिबिरात 36 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. आमदार करणदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. शिबिर दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होते.
याप्रसंगी भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले त्यावेळी शंभुनाथ वरर्गणे, विठ्ठल लेडे वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार, स्वप्निल देवळकर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा मुख्यधुरा राहुल बांदुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून कार्यक्रम यशस्वीपणे पार केला आहे




