वरोरा :-वरोऱ्याचे लाडके आणि लोकप्रिय युवा आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांचा वाढदिवस आज शहरात मोठ्या उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आमदार करणदादा देवतळे मित्र परिवारातर्फे साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ८४ किलो वजनाची भव्य ‘लाडू तुला’ आयोजित करण्यात आली होती.
वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ औपचारिकता न पाळता, कार्यकर्त्यांनी थेट जनसामान्यांमध्ये मिसळून हा आनंद साजरा केला. लाडू तुलेनंतर उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये लाडूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. या नेत्रदीपक सोहळ्याने शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘आमदार करणदादा देवतळे मित्र परिवारा’ तर्फे करण्यात आले होते. यामध्ये सतीश निर्बान , ऋषभ निर्बान , लव निर्बान , अजिंक्य नरडे, सौरभ गोल्हार, खुश निर्बान , ओम वरभे, हर्षद बोडणे, आनंद मोरे, सुधीर डोंगे, सुरज लोणकर, अनिकेत मित्तलवार, निपुण मेहता, बाला चांभारे आणि प्रफुल नरडे यांच्यासह मित्र परिवारातील अनेक सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
आमदार साहेबांच्या लोकसंपर्काचे आणि त्यांच्या कामाच्या शैलीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमावर वरोरा शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




