वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात एका मोठ्या कालखंडाचे नेतृत्व करणाऱ्या ‘देवतळे’ घराण्याचा वारसा आज एका नव्या स्वरूपात बहरताना दिसत आहे. स्व. दादासाहेब देवतळे आणि स्व. संजय देवतळे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे करणदादा देवतळे आज वरोऱ्याच्या युवकांसाठी एक नवा ‘ऊर्जास्त्रोत’ ठरले आहेत.
🔷 राजकीय वारसा आणि संघर्षाची गाथा 🔷
वरोरा मतदारसंघाच्या राजकारणात १९८६ च्या सुमारास निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम स्व. संजय देवतळे यांनी केले होते. भाजपच्या माध्यमातून त्यांनी वरोऱ्यात जो जनसंपर्क निर्माण केला आणि कार्यकर्त्यांचे जाळे विणले, ते आजही या मतदारसंघाची ओळख आहे. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जनतेच्या आग्रहाखातर करण देवतळे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले.
🔷 युवकांचे संघटन आणि आधुनिक नेतृत्व 🔷
इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले करण देवतळे हे केवळ राजकीय वारसदार नाहीत, तर एक सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असणारे नेतृत्व आहेत. ‘युवा मोर्चा’च्या माध्यमातून त्यांनी केवळ भाजपमधीलच नव्हे, तर पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक तरुणांना एकत्र जोडण्याचे कसब दाखवले आहे. “युवकांना सोबत घेतल्याशिवाय भविष्यातील राजकारण शक्य नाही,” हे ओळखून त्यांनी केलेली संघटनात्मक बांधणी आज वरोरा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.
🔷 संस्कारांची शिदोरी आणि लोकांशी नाळ 🔷
स्व. संजय देवतळे आणि श्रीमती श्वेताताई देवतळे यांच्याकडून मिळालेले संस्कार करण यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतात. श्रीमंतीचा अहंकार न ठेवता, सामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणे, रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम यामुळे त्यांनी जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. आजही त्यांना पाहताना जुन्या कार्यकर्त्यांना ‘संजय भाऊंची’ (साहेब)आठवण येते, यातच त्यांच्या नेतृत्वाचे यश दडलेले आहे.
🔷 दिग्गज नेत्यांचा आशीर्वाद आणि भविष्यातील आशा🔷
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काम करताना त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांसारख्या दिग्गज नेत्यांचे पाठबळ लाभले आहे. केवळ पक्षातच नव्हे, तर राजकीय मतभेद विसरून सर्वच स्तरांतील नेत्यांचे त्यांना असणारे प्रेम हे त्यांच्या संयमी आणि सर्वसमावेशक स्वभावाची पावती आहे.
🔷 वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 🔷
आज करण देवतळे यांचा वाढदिवस असून, यानिमित्त ‘देवतळे मित्र परिवारा’तर्फे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. वरोरा मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या या युवा नेतृत्वाच्या भावी राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी संपूर्ण मतदारसंघ आशावादी आहे.
एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून करणदादा देवतळे हे आगामी काळात वरोऱ्याच्या राजकारणाला नवी दिशा देतील, यात शंका नाही!




