भद्रावती :-धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत, भद्रावती येथे मोहरम ताजिया मिरवणुकीच्या निमित्ताने शिवसेना परिवार, युवा सेना आणि शहर विकास आघाडीच्या वतीने नागरिक व भाविकांसाठी सरबत वाटपाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला. ‘समाजसेवा हीच खरी राजकारण’ हे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करत, या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
💠 सामाजिक सलोख्याचा नवा पायंडा 💠
कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वधर्मसमभावाची परंपरा जोपासत, ताजिया मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांची तहान भागवण्याचा हा प्रयत्न भद्रावतीकरांच्या पसंतीस उतरला. “समाजातील प्रत्येक घटकाशी असलेले आपुलकीचे नाते आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच शिवसेनेची खरी ओळख आहे,” असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
💠दिग्गजांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह 💠
शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना सरबत वाटप केले. यावेळी नगरविकास आणि समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असलेल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीने उपक्रमाची व्याप्ती वाढली होती.
💠 प्रमुख उपस्थिती 💠
या सेवाकार्यात नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी , युवा सेना लोकसभा समन्वयक व नगरसेवक महेश जिवतोडे , शिवसेना शहर प्रमुख प्रफुलभाऊ सरवान , युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक , बांधकाम सभापती व नगरसेवक मंगेशभाऊ सोनुलकर , नगरसेवक संतोषभाऊ कुरेकर , गौरव नागपुरे , माजी नगरसेवक राजुभाऊ सारंगधर , प्रमोदभाऊ गेडाम यांच्यासह कमलेश दातारकर, साहिल वांढरे, सोनू रोडे, वैष्णव डावले, अनोख गेडाम, अमन झिंगरे, अनिकेत मंगाम आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या या ‘सर्वसमावेशक’ चेहरा आणि आक्रमक समाजसेवेमुळे भद्रावती शहरात या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.




