Home जिल्हा ओबीसींच्या हक्कासाठी जनसागर लोटला; १४ मे चा शासन निर्णय रद्द करा –...

ओबीसींच्या हक्कासाठी जनसागर लोटला; १४ मे चा शासन निर्णय रद्द करा – खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा इशारा.

चंद्रपूर :-ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी आणि सरकारचा ‘अन्यायी’ चेहरा उघड पाडण्यासाठी आज चंद्रपूरच्या रस्त्यांवर ओबीसी बांधवांचा महापूर लोटला. ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ’ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य ‘ओबीसी महामोर्चा’ने प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी हजेरी लावत या लढ्याला बळ दिले.




💠 शासन निर्णयाविरुद्ध एल्गार 💠
महाराष्ट्र सरकारने दि. १४ मे २०२६ रोजी घेतलेला वादग्रस्त कॅबिनेट निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करावा आणि ओबीसी समाजाची “जातिनिहाय जनगणना” पूर्ण करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता. जोपर्यंत ओबीसींना त्यांचे घटनात्मक हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा खासदार धानोरकर यांनी दिला.




मोर्चादरम्यान बोलताना उपस्थितांनी सरकारला ठणकावून सांगितले की, “आता ओबीसी समाज जागृत झाला आहे. केवळ आश्वासनांवर बोळवण करून चालणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि आरक्षणावरील गदा हटत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.”




💠 प्रचंड जनसमुदाय 💠:-ओबीसी बांधवांनी अलोट गर्दी करत आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले.




💠 आक्रमक पवित्रा 💠 :-न्याय हक्क आमचा, कुणाच्या बापाचा नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.




💠 स्पष्ट इशारा 💠 :-शासनाचा १४ मे चा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला.आजच्या या महामोर्चाने सरकारला ओबीसींच्या रोषाची प्रचिती दिली असून, येणाऱ्या काळात या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.