नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे तरुण तडफदार नेते माननीय श्री. अमित साहेब ठाकरे आज, मंगळवार दिनांक १९ मे रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मनविसेतर्फे आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि रोमहर्षक ‘रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या’ अंतिम सामन्याला ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भातील मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे हे नागपूरमध्ये मनसेच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठकही घेणार आहेत. आगामी राजकीय गणितांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेला या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
🔴 असा असेल अमित ठाकरे यांचा ‘मिनिट-टू-मिनिट’ दौरा:
अमित ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:
दुपारी ०१:३५ वा.– मुंबई विमानतळावरून विमानाने नागपूरकडे रवाना.
दुपारी ०२:४५ वा. – नागपूर विमानतळावर आगमन आणि मनसैनिकांकडून भव्य स्वागत. त्यानंतर थेट हॉटेलकडे प्रयाण.
दुपारी ०३:०० वा.– हॉटेलमध्ये आगमन आणि स्वागत दुपारी ०४:०० वा. – हॉटेलमध्ये मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक आणि चर्चा.
सायंकाळी ०७:३० वा.– हॉटेलवरून थेट क्रिकेट ग्राउंडकडे रवाना.
सायंकाळी ०७:४० वा.– क्रिकेट ग्राउंडवर आगमन आणि भव्य स्वागत.
रात्री ०८:०० वा.– रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा भव्य ‘टॉस’ (अमित ठाकरे यांच्या हस्ते).
रात्री ०८:२५ वा. – क्रिकेट ग्राउंडवरून पुन्हा हॉटेलकडे रवाना.
रात्री ०९:०० वा. – हॉटेलवरून नागपूर विमानतळाकडे प्रयाण.
रात्री १०:०० वा.– नागपूर विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना.
👉 मनसैनिकांनो सज्ज व्हा !
विदर्भाच्या भूमीत मनसेचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या नेत्याचे जंगी स्वागत करण्यासाठी आज नागपुरात मनसैनिकांचा महापूर येणार हे निश्चित!
🙏 जय विदर्भ 🙏




