वरोरा :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वरोरा शहरात शिवतेजाचा अभूतपूर्व जागर होणार आहे. उद्या, दिनांक २० मे, बुधवार रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता स्थानिक आंबेडकर चौक येथे भव्य ‘शिवशंभु व्याख्यान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते राकेश पिंजन (पुणे) हे आपल्या अमोघ आणि धगधगत्या वाणीतून शिवशंभूंचा जाज्वल्य इतिहास मांडणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वरोरेकर सज्ज झाले आहेत.
‼️ राजकीय व सामाजिक दिग्गजांची मांदियाळी!
या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. करनदादा देवतळे भूषवणार आहेत. तर सोहळ्याचे शानदार उद्घाटन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. रवींद्रजी शिंदे आणि मनसे नेते श्री. राजुभाऊ उंबरकर यांची मुख्य उपस्थिती असेल.
‼️ सन्माननीय अतिथी म्हणून लाभणार ‘या’ नेतृत्वाची साथ:
कार्यक्रमाला वरोरा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, ज्यात:
🟰 सौ. अर्चनाताई आ. ठाकरे (नगराध्यक्ष, वरोरा)
🟰 श्री. राहुल बालमवार (जिल्हाध्यक्ष, मनसे चंद्रपूर)
🟰 श्री. मनदीप रोडे (जिल्हाध्यक्ष, मनसे चंद्रपूर)
🟰 श्री. मुकेश जीवतोडे (लोकसभा संघटक, शिवसेना शिंदे गट)
🟰 श्री. मनीष जेठानी (बांधकाम सभापती व जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव ठाकरे गट)
🟰 श्री. विलास जी नेरकर (विधानसभा अध्यक्ष, अजित पवार गट)
🟰 श्री. परागजी दबंडे (विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद)
🟰 श्री. देवानंद महाजन (सरपंच, माढेळी)
“अवघे अवघे या, शिवशंभु तेजात न्हाऊन जा!”
हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची धगधगती मशाल तरुणांच्या मनात पेटवणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या सोहळ्याचे नियोजन आयोजक प्रशांत झुंजारे , आलोक जाधव, त्रिशूल घाटे, आनंद गेडाम आणि साजिद पठाण यांनी अत्यंत चोखपणे केले आहे.
या अभूतपूर्व आणि भव्य शिवशंभु व्याख्यान सोहळ्यास वरोरा शहर व परिसरातील तमाम शिवभक्तांनी, माता-भगिनींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे जाहीर आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
⚜️ कार्यक्रमाचा तपशील संक्षिप्त ⚜️
👉 दिनांक :-२० मे २०२६, बुधवार
👉 वेळ :-सायंकाळी ०६:०० वाजता
👉 स्थळ :-आंबेडकर चौक, वरोरा.
🙏 जय विदर्भ🙏




